खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती | पुढारी

खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती

वेल्हे : दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी खडकवासला धरणसाखळीत विश्रांती घेतली. त्यामुळे दुपारी खडकवासला धरणातून सुरू असलेला मुठा नदीपात्रातील विसर्ग बंद करण्यात आला. शुक्रवार सकाळपासून पानशेत, वरसगाव, खोर्‍यासह सिंहगड भागात पावसाची उघडीप होती. डोंगरी पट्ट्यात ढगाळ वातावरण व ऊन पडले होते. चारही धरण माथ्यावर दिवसभरात एक मिलिमीटरही पावसाची नोंद झाली नाही.

पानशेत, वरसगाव धरणातील तसेच धरणक्षेत्रातील पाण्याची आवक कमी झाल्याने खडकवासलातील पाण्याची आवकही कमी झाली आहे. सध्या खडकवासलातून मुठा कालव्यात 1005 क्युसेक तसेच पिण्यासाठी पाणी सोडले जात आहे. सकाळपासून टप्प्याटप्प्याने खडकवासलाच्या विसर्गात कपात करण्यात आली. एक महिना उशिरा पाऊस सुरू होऊनही 1 जुलैपासून काही अपवाद वगळता धरणसाखळीत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे दीड महिन्यात खडकवासलातून तब्बल 21 टीएमसी जादा पाणी सोडण्यात आले.

Back to top button