

पिंपरी : भाड्याने वापरण्यास दिलेली जमीन खाली करण्यास सांगितल्याने महिलेला धक्काबुक्की करीत तिचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी (दि. 26) देहूू-आळंदी रोडवर घडली. याप्रकरणी 36 वर्षीय महिलेने चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कृष्णा शहा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांच्या वडिलांनी आरोपीला भाड्याने जमीन दिली होती. दरम्यान, फिर्यादी यांनी आरोपीला जमीन खाली करा, असे सांगितले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ करत हाताने ढकलून दिले. तसेच, फिर्यादींसोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादीच्या आईलाही धक्का देऊन शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे. चिखली पोलिस तपास करीत आहेत.