पुणे : कर्नाटकातील अल्पवयीन मुलीचे पुण्यात अपहरण; बिदरहून रक्षाबंधनासाठी आली होती | पुढारी

पुणे : कर्नाटकातील अल्पवयीन मुलीचे पुण्यात अपहरण; बिदरहून रक्षाबंधनासाठी आली होती

पुणे : कर्नाटक येथून पुण्यात रक्षाबंधनासाठी, तसेच दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी आलेल्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादींचे मेव्हणे पुण्यातील कोंढवा परिसरात राहतात.

पीडित मुलगी मूळची बिदरमधील आहे. ती पुण्यात रक्षाबंधन व दहीहंडी उत्सवासाठी फिर्यादीच्या मेव्हण्याच्या घरी आली असताना तिचे अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. ती कर्नाटकात परत न आल्याने तिच्या घरच्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन व कर्नाटकात चौकशी केल्यानंतर फिर्याद दिली आहे.

Back to top button