उंडवडी : बदलत्या वातावरणाचा कांद्यावर परिणाम | पुढारी

उंडवडी : बदलत्या वातावरणाचा कांद्यावर परिणाम

उंडवडी : बारामती तालुक्यातील उंडवडी सुपेसह आजूबाजूच्या परिसरात बदलत्या वातावरणामुळे कांदा पिकावर दुष्परिणाम जाणवत आहे. पिकांची वाढ खुंटली आहे. शेंडे पिवळे पडू लागल्याने शेतकर्‍यांनी चिंता व्यक्त केली आहे. सतत ढगाळ वातावरण तर कधी ऊन पडत आहे, तर कधी रिमझिम पावसाच्या सरी पडत आहेत, तर अचानक वारे वाहत असून कधी उष्ण तर कधी गारवा निर्माण होत असल्याने एकसारखे वातावरण राहत नसल्यामुळे पिकावर आता रोगराई निर्माण होऊ लागली आहे.

याचा कांदा पिकावर परिणाम दिसून येत आहे. कांदा पिकाची शेंडे पिवळी पडू लागल्याने वाढ खुंटली आहे. वातावरणात असाच बदल होत राहिला तर पिकावर कितीही औषध फवारणी केली तरी रोगराई कमी होत नसल्यामुळे सध्या पिके धोक्यात असल्याचे गणेश भगत या शेतकर्‍याने सांगितले. सतत होणा-या रिमझिम पावसानेही शेतात पाणी साचल्याने गवताचे प्रमाण वाढले असून, गवतामुळे पिके पोषणासही बाधा होत आहे. वारंवार गवतावर औषध फवारणी करूनही अधूनमधून होणार्‍या पावसाचा सरीमुळे गवतावर काहीच परिणाम होत नसल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Back to top button