पिंपरी : सोशल मीडियावरील मित्राकडून लैंगिक अत्याचार | पुढारी

पिंपरी : सोशल मीडियावरील मित्राकडून लैंगिक अत्याचार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : सोशल मीडियावरून ओळख झालेल्या मित्राने तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना रुपीनगर आणि ठिकठिकाणी लॉजवर घडली. गणेश रोहिदास गोरे (24, रा. परळी वैजनाथ, जि. बीड) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत तरुणीने बुधवारी (दि. 24) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

ही घटना 9 मे 2021 ते 23 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये रुपीनगर, तळवडे तसेच वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजवर घडली. तरुणी आणि आरोपी यांची ओळख ‘इंस्टाग्राम’वरून झाली. त्यानंतर आरोपीने तरुणीशी लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. ‘इंस्टाग्राम’वरील संभाषण व्हायरल करून बदनामी करतो, अशी धमकी फिर्यादी तरुणीला दिली.

Back to top button