पुणे : बलात्कार करणार्‍या पोलिसाला बेड्या; फोटो मित्रांना दाखवून केली बदनामी | पुढारी

पुणे : बलात्कार करणार्‍या पोलिसाला बेड्या; फोटो मित्रांना दाखवून केली बदनामी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: लग्नाच्या आमिषाने महिला पोलिस कर्मचार्‍यावर बलात्कार केला; एवढेच नाही तर तिला वारंवार मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिचे अर्धनग्न फोटो काढून मित्रांना दाखवून बदनामीही केली. या प्रकरणी खडक पोलिसांनी एका पोलिस शिपायाला अटक केली आहे. संदीप कुंडलिक जाधव असे या शिपायाचे नाव आहे. सध्या तो पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2020 पासून सुरू होता. याबाबत एका महिला पोलिसाने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकत्र काम करीत असताना आरोपीने फिर्यादींना लग्नाचे आमिष दाखवून इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवले. त्याचवेळी त्याने इतर मुलींशी अनैतिक संबंध ठेवून फिर्यादींसोबत लग्न न करता त्यांची फसवणूक केली. त्यांना वारंवार मारहाण करून मारून टाकण्याची धमकी दिली. त्यांचे अर्धनग्न फोटो काढून ते मित्रांना दाखवून बदनामी केली. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित महिला पोलिस कर्मचार्‍याने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संदीप जाधवला अटक केली.

Back to top button