वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पाचे काम पूर्ण, ‘रेरा’ नोंदणी पूर्ण

वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पाचे काम पूर्ण, ‘रेरा’ नोंदणी पूर्ण
Published on
Updated on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वाल्हेकरवाडी येथील गृहप्रकल्पात आत्तापर्यंत 600 सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या गृहप्रकल्पासाठी 'रेरा' नोंदणी पूर्ण झाली आहे. वरिष्ठांची मंजुरी घेऊन लवकरच या गृहप्रकल्पासाठी ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक 30 व 32 मध्ये 38 हजार 200 चौरस मीटर जागेत 792 घरांचा गृहप्रकल्प साकारत आहे. या गृहप्रकल्पाच्या कामासाठी 7 जानेवारी 2016 रोजी आदेश देण्यात आले. प्रत्यक्षात राजकीय विरोधामुळे गृहप्रकल्पाचे काम सुरू होण्यास त्यानंतर पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागला.

या गृहप्रकल्पाचे काम मंदावल्याने आत्तापर्यंत त्यासाठी तीनदा मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच, कंत्राटदाराकडून दंडापोटी 1 कोटी 27 लाख रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. सध्या गृहप्रकल्पाचे काम वेगाने सुरु असल्याने दररोज 10 हजार रुपयांचा आकारला जाणारा दंड रद्द केला आहे. प्रकल्पामध्ये वन रुम किचन सदनिका 378 आहेत. तर, वन बीएचके सदनिका 414 इतक्या आहेत.

सुविधांची कामे सुरू
प्रकल्पामध्ये आवश्यक विविध सुविधा विकसित करण्याचे काम सध्या सुरु आहे. अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा नलिका, मलनिस्सारण नलिका, विद्युतविषयक कामे, 0.475 दशलक्ष लिटर क्षमतेचा मैलाशुद्धीकरण केंद्र आदींचा त्यामध्ये समावेश आहे.

लवकरच निघणार सोडत
वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पासाठी आवश्यक माहिती पुस्तिका तयार आहे. पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांची मंजुरी घेऊन गृहप्रकल्पासाठी ऑनलाइन सोडत काढण्यासाठी लवकरच तारीख निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news