सासवड : आमदारांना झेड प्लस सुरक्षा द्या: खासदार सुळे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

सासवड : आमदारांना झेड प्लस सुरक्षा द्या: खासदार सुळे यांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी

सासवड; पुढारी वृत्तसेवा: विधानमंडळात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी व असंवेदनशील आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री
अमित शहा यांना टि्वटरद्वारे महाराष्ट्रातील आमदारांना झेड प्लस सुरक्षा मिळावी अशी मागणी केली आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सासवड (ता. पुरंदर) येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 24 तास समाजहिताची कामे करीत असतो. त्यामुळे केव्हाही निवडणुका लागल्या तरी आम्ही तयार आहोत. सातत्याने निर्णय बदलणारे हे सरकार म्हणजे यु टर्न सरकार असल्याचे सुळे यांनी सांगितले

शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे हनिमून सारखे आहे. विधानसभेमध्ये भाजपा धमक्या देत असेल तर यापुढे विधान भवनात हेल्मेट घालून जावे लागेल. त्याचबरोबर गुंजवणी प्रश्नावर महाविकास आघाडीच्या काळामध्ये अनेक बैठका घेण्यात आल्या होत्या. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ व दिवे येथील आंतरराष्ट्रीय बाजार यासारखे प्रकल्प झाले पाहिजेत, असे त्यां म्हणाल्या. पुणे जिल्ह्याला गेले दोन महिन्यांपासून पालकमंत्री मिळत नाही. यामुळे अनेक कामे रखडली आहेत. विकास कामांना प्राधान्य मिळणे गरजेचे आहे.

बारामती लोकसभा मतदार संघांमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू व
त्यांची तीन दिवसाची राहण्याची व्यवस्था देखील आम्ही करू. सत्ता संघर्षाच्या राजकारणामध्ये आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असे सुळे यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी
बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news