सातगाव पठार भागात बटाटा पीक जोमात | पुढारी

सातगाव पठार भागात बटाटा पीक जोमात

पेठ : सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात बटाटा पीक जोमात आले आहे. सातगाव पठार हे पावसाळी बटाटा उत्पादनाचे आगार समजले जाते. या परिसरात साडेसहा हजार एकरवर बटाटा लागवड केली जाते. अनेक ठिकाणी बटाटा पीक फुलोर्‍यात आले आहे. शेतकरी यावर्षी चांगला पाऊस झाल्याने बटाटा पिकाचे उत्पादन चांगले निघेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. बटाटा पिकावर मावा व किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकरी सध्या फवारणी करण्याच्या तयारीत आहेत.

कुरवंडी, भावडी, पेठ भागात बटाटा पीक जोमात आल्याची माहिती थूगाव येथील शेतकरी वसंतराव एरंडे व विकास एरंडे या शेतकर्‍यांनी दिली. एकरी 55 ते 60 हजार रुपये बटाटा पिकासाठी खर्च येत असल्याचे भावडी विकास सोसायटीचे अध्यक्ष सोपानराव नवले यांनी दिली. बटाटा पिकास सध्या छोटे छोटे बटाटे लागले आहेत. अधून मधून पावसाच्या सरी पडत असल्याने बटाटा पिकास पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पीक जोमात आले आहे.

Back to top button