चाकण : काम सांगितल्याच्या रागातून दोघांना मारहाण | पुढारी

चाकण : काम सांगितल्याच्या रागातून दोघांना मारहाण

चाकण; पुढारी वृत्तसेवा: कंपनीत काम सांगितल्याच्या कारणावरून चार कामगारांनी दोघांना कंपनीतून बाहेर आल्यानंतर बेदम मारहाण केली. ही घटना चाकण एमआयडीसीमध्ये अ‍ॅमेझॉन कंपनीच्या गेटवर आंबेठाण (ता. खेड) येथे घडली. अनिकेत बंडू पोटे (वय 22, रा. कडूस, ता. खेड), सूरज वारे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनिकेत यांनी महाळुंगे पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार ओमकार शेवाळे, ओमकार भैय्ये, मिलिंद जाधव, लखन शेवाळे (सर्व रा. शेवाळवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी आणि त्यांचा मित्र सूरज वारे काम झाल्यानंतर सोमवारी (दि.22) सायंकाळी कंपनीच्या बाहेर आले. तिथे आरोपींनी त्यांना अडवले. ‘कंपनीत काम सांगणारे तुम्ही कोण, आम्ही आमचे काम करतो. तुम्ही ढवळाढवळ कशाला करता,’ असे म्हणून ओमकार शेवाळे याने लोखंडी रॉड फिर्यादीच्या डोक्यात मारला. सूरज वारे भांडण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांनाही दगडाने मारहाण केली. त्यांनतर शिवीगाळ करून आरोपी निघून गेले.

Back to top button