पुणे : रेल्वे पोलीसांच्या कस्टडीत आरोपीचा मृत्यू? | पुढारी

पुणे : रेल्वे पोलीसांच्या कस्टडीत आरोपीचा मृत्यू?

पुणे, पुढारी वृत्तसेवा : चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या एका संशयित आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. नागेश पवार असे मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

केजरीवाल हे घोटाळ्याचे खरे सूत्रधार; भाजपचा आरोप

दरम्यान, लोहमार्ग पोलिसांनी तो आजारी पडल्यामुळे त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे लोहमार्ग पोलिस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांनी सांगितले.

16 ऑगस्ट रोजी रेल्वे पोलिसांनी चोरीच्या आरोपावरुन त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला.

सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग! : बाळासाहेब थोरात

Back to top button