पिंपरी : आईशी वाद घालणार्‍या तरुणावर खुनी हल्ला | पुढारी

पिंपरी : आईशी वाद घालणार्‍या तरुणावर खुनी हल्ला

पिंपरी : आईशी वाद घातल्याचा कारणावरून मुलाने साथीदारांसोबत मिळून एकावर खुनी हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री संविधान चौकाजवळ घरकूल, चिखली येथे घडली. अमोल बारीकराव शिनगारे (वय 25), असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी समाधान बारीकराव शिनगारे (32, रा. घरकूल, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, चिक्या उर्फ साहील चंद्रकांत निसर्गंध, माउली विष्णू उनवणे (रा. घरकूल, चिखली) आणि तीन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी चिक्या याच्या मनात आपल्या आईसोबत वाद घातल्याचा राग होता. त्यावरून त्याने साथीदारांसोबत मिळून फिर्यादी यांचा भाऊ अमोल याला बेदम मारहाण केली. यामध्ये अमोल याच्या चेहर्‍यावर, डोक्यावर, हातावर गंभीर दुखापत झाली आहे. तपास चिखली पोलिस करीत आहेत.

Back to top button