लोणावळा : रेल्वे मार्गावर दगड कोसळले | पुढारी

लोणावळा : रेल्वे मार्गावर दगड कोसळले

लोणावळा : मध्य रेल्वेच्या पुणे-मुंबई लोहमार्गावरील खंडाळा घाटातील मंकी हिल याठिकाणी मंगळवारी (दि. 23) पहाटेच्या सुमारास पुन्हा दगड कोसळण्याची घटना घडली आहे. खंडाळा घाटातील मिडल लाईनवर कि.मी. क्रमांक 118 येथे ही घटना घडली आहे. यामध्ये एक मोठा दगड खाली येऊन रेल्वे इंजिनच्या समोरील गार्डमध्ये अडकल्याने रेल्वे इंजिन रुळावरून खाली घसरले. घटनेची माहिती समजल्यानंतर पहाटे 3.30 वाजता रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहचत त्यांनी दगड बाजूला करण्याचे काम सुरू केले. घाटमाथ्यावर पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे.

Back to top button