पुणे : शांततेच्या कारणातून रूममेट भिडले | पुढारी

पुणे : शांततेच्या कारणातून रूममेट भिडले

पुणे : शांततेच्या कारणातून रूममेट एकमेकांच्या विरुद्ध भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. रूममेट गोंधळ घालत असल्याने झोपलेल्या एका मित्राने त्यांना शांत बसण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने चौघांनी त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर सळईने त्याच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.

ही घटना कोंढवा परिसरातील एनआयबीएम रोडवर घडली. या प्रकरणी मनोजकुमार कश्यप (वय 25) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून चार रूममेट मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button