पिंपळे गुरवमधील मैदानावर गाड्यांचे पार्किंग; खेळाडूंना सरावासाठी मिळेना जागा

पिंपळे गुरवमधील मैदानावर गाड्यांचे पार्किंग; खेळाडूंना सरावासाठी मिळेना जागा
Published on
Updated on

पिंपळे गुरव : पिंपळे गुरव परिसरात पालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे हाती घेतली आहेत. त्यामुळे या परिसराचा कायापालट होत आहे; मात्र विकासकामे करताना मैदानांसाठी आरक्षित जागांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असून, या जागेवर गाड्यांचे पार्किंग होत असल्याने खेळाडूंना सरावासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

पिंपळे गुरव येथील बॅटमिंटन हॉललगतची जागा क्रमांक 344 आणि 344 अ मैदानासाठी आरक्षित असून मैदान विकसित करण्यासाठी पालिका विभागाकडून याबाबत अद्यापही कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. या आरक्षित मैदानावर सकाळ आणि संध्याकाळी खेळाडू सरावासाठी येतात; मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ख़ेळाच्या मैदानावर गवत वाढलेले असून, संध्याकाळी या परिसरात मद्यपींचा अड्डा असतो; तसेच या ठिकाणी चार चाकी गाड्या उभ्या केल्या जातात.

त्यामुळे खेळाडुंना सराव करणे गैरसोयीचे ठरते. पावसाळ्यात या ठिकाणी सगळीकडे चिखल होतो. अशा स्थितीत खेळाचा सराव करणे जिकीरीचे ठरते. त्यामुळे सराव करायचा कुठे, असा प्रश्न खेळाडू उपस्थित करत आहेत. पिंपरी-चिंचवड शहर उद्योग, व्यवसायांमुळे नावारूपाला आले आहे; तसेच इतर क्षेत्रातही शहर प्रगती करत आहे. तसेच शहरातील अनेक खेळाडू विविध क्रीडा प्रकारात उज्वल यश संपादन करत आहेत.

शहराचे जसे औद्योगिक धोरण आहे. त्याप्रमाणे पालिकेने क्रीडा धोरण राबविणे अपेक्षित आहे. शहर परिसरात उत्तम सुविधा असलेली क्रीडांगणे देखील आहेत; मात्र पिंपळे गुरव येेथे मैदानांसाठी आरक्षित जागा असूनही त्याठिकाणी गाड्या पार्किंग केल्या जात असल्याने याठिकाणी खेळाडुंना सराव करणे शक्य होत नाही. परिणामी सरावात खंड पडल्याने स्पर्धांमध्ये यश मिळविणे कठीण जाते.

येथील आरक्षित जागेवर क्रीडांगण विकसित करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक खेळाडू करत आहेत. मैदानासाठी जागा आरक्षित आहे; परंतु या ठिकाणी खेळाडुंना सराव करण्यासाठी जागाच उपलब्ध होत नाही. त्यामुळे सराव करायचा कुठे, असा प्रश्न या परिसरात राहणारे खेळाडू करत आहेत. सद्यस्थितीत खेळाच्या आरक्षित जागेत गाड्यांचे पार्किंग केले जाते. त्यामुळे अजूनही किती दिवस सरावसाठी मैदानाची वाट पाहावी लागणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी- चिंचवड सांस्कृतिक नगरी म्हणून देखील ओळखली जावू लागली आहे. त्याचबरोबर येथील खेळाडूदेखील विविध स्पर्धांत यस मिळवून नावरूपास येत आहेत. त्यामुळे शहरातील खेळाडुंना अद्ययावत क्रीडांगणे पालिकेने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे निश्चितपणे शहरातील खेळाडू विविध क्रीडा प्रकारात उज्वल यश प्राप्त करू शकतील. त्यामुळे साहजिकच पिंपरी-चिंचवडचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकू शकेल. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी पालिकेच्या स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील वाघुंडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होवू शकला नाही.

पिंपळे गुरव परिसरात खेळाडूंसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी मैदान उपलब्ध नाही. आरक्षित जागेवर पालिकेने क्रीडा संकुल उभे करावे, आम्हांला सध्या घोलप महाविद्यालयाच्या मैदानावर तसेच पीडब्ल्यूच्या मैदानावर सराव करावा लागतो. त्यामुळे पालिकेने येथील आरक्षित जागा खेळाडूंसाठी उपलब्ध करून द्यावी.

                                                                            – स्थनिक कबड्डीपटू

पिंपळे गुरवमधील आरक्षित जागेवर क्रीडासंकुल विकसित करणे गरजेचे आहे. मुलांना खेळाच्या प्रशिक्षणसाठी पिंपळे गुरवमध्ये जागा उपलब्ध नाही. त्यामुळे परिसरातील खेळाडूंना पीडब्ल्यूडीच्या मैदानावर सरावासाठी जावे लागते; मात्र मैदानात इतरही कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे खेळाडूंना सरावासाठी जागा उपलब्ध नसते.

                                                                   -सारिका भंडलकर, पालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news