बाणेर : मुळा नदीपात्रामध्ये राडारोडा | पुढारी

बाणेर : मुळा नदीपात्रामध्ये राडारोडा

बाणेर; पुढारी वृत्तसेवा: बाणेर भागातील मुळा नदीच्या पात्रात ब्लू लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आलेला आहे. नदीकडेला सर्रासपणे अनेक बांधकाम व्यावसायिक राडाराडा टाकतात; परंतु याकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. एका बांधकाम व्यावसायिकाच्या लेबर कॅम्पमागे ब्लू लाईनमध्ये हा राडाराडा मोठ्या प्रमाणात टाकला आहे. सध्याही रात्रीच्या वेळी हा राडाराडा टाकला जात असल्याचे येथील काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी सांगितले आहे.

या राडारोड्यामुळे मैलापाणी शुद्धीकरण केंद्रापुढे असलेला मुख्य रस्त्यावर मातीचा थर साचून चिखल झाला आहे. या ठिकाणावर मोठे ट्रक, हायवासारख्या वाहनांनी राडाराडा आणून टाकला जात आहे. मुख्य रस्त्यावर पसरलेल्या चिखलामुळेही या ठिकाणी राडाराडा टाकला जात असल्याचे लक्षात येत असले, तरीही प्रशासकीय कर्मचारी या ठिकाणी टाकण्यात येणार्‍या विनापरवाना राडारोड्याकडे दुर्लक्ष का करत आहेत, हा प्रश्नच आहे.

ब्लू लाइनमध्ये टाकलेल्या राडारोड्याची माहिती घेऊन अधिकार्‍यामार्फत घटनास्थळाची पाहणी करू आणि संबंधितांना नोटीस बजावून कडक
कारवाई करू.
संदीप खलाटे, सहाय्यक आयुक्त, औध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय

 

Back to top button