पुणे : दुचाकी विक्रीच्या बहाण्याने गंडा; सायबर चोरट्याने सव्वालाख भरण्यास भाग पाडले | पुढारी

पुणे : दुचाकी विक्रीच्या बहाण्याने गंडा; सायबर चोरट्याने सव्वालाख भरण्यास भाग पाडले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दुचाकी विक्रीच्या बहाण्याने सायबर चोरट्याने एका व्यक्तीला 1 लाख 29 हजार रुपयांचा आर्थिक
गंडा घातला. याप्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथील 39 वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. फिर्यादींनी सोशल मीडियावर दुचाकी विक्रीची जाहिरात पाहिली होती. त्यानुसार त्यांनी तेथे दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधला.

त्या वेळी त्यांना प्रकाश कुमार नावाच्या व्यक्तीने त्याचे ओळखपत्र व पॅन कार्डची प्रत पाठवून फिर्यादींचा विश्वास संपादन केला. त्यानंतर गाडी डिलिव्हरी देण्यासाठी डिपॉझिट व क्लीअरन्स रक्कम भरण्याचा बहाणा करून वेळोवेळी फिर्यादींकडून 1 लाख 29 हजार रुपये ऑनलाइन भरून घेतले. मात्र, त्यानंतर देखील फिर्यादींना दुचाकी देण्यात आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

Back to top button