भामा आसखेड : मशिनमध्ये अडकल्याने तरुण कामगाराचा मृत्यू | पुढारी

भामा आसखेड : मशिनमध्ये अडकल्याने तरुण कामगाराचा मृत्यू

भामा आसखेड : खेडच्या एसईझेड क्षेत्रातील अबेरडेयर टेक्नॉलॉजिस कंपनीत मशिनमध्ये अडकून स्वस्तिक दयाराम शेलार (वय 25) या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी (दि. 22) ही घटना घडली. कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणामुळे चालू मशिनमध्ये अडकून भावाचा अपघात झाल्याची फिर्याद मयत कामगार स्वस्तिकचा भाऊ प्रतीक दयाराम शेलार याने खेड पोलिस ठाण्यात दिली आहे.

एसईझेड क्षेत्रातील कनेरसर हद्दीत अबेरडेयर टेक्नॉलॉजिस कंपनी असून, या कंपनीत स्वस्तिक गेल्या सहा महिन्यांपासून कंपनीत कामास होता. सेकंड शिफ्ट (रात्रपाळी) रात्री 9 ते सकाळी 9 पर्यंत असल्याने स्वस्तिक नेहमीप्रमाणे 7:15 वाजता घरातून कंपनीत कामावर जाण्यासाठी गेला. सोमवारी पहाटे 3.30 वाजता प्रतीकचा मावसभाऊ योगेश बोरकर याला कॉन्ट्रॅक्टरने फोन करून सांगितले की, स्वस्तिकचा अपघात झाला असून, त्याला चांडोली येथील सरकारी दवाखान्यात आणले आहे. प्रतीक व योगेश तत्काळ चांडोली दवाखान्यात आले.

Back to top button