दापोडी : गणेश मंडळांनी खबरदारी घ्यावी पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांचे आवाहन | पुढारी

दापोडी : गणेश मंडळांनी खबरदारी घ्यावी पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांचे आवाहन

दापोडी : उत्सव साजरा करताना नियमांचे कुठेही उल्लंघन होणार नाही. याची खबरदारी मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी घ्यावी. सण उत्साहात व आनंदात साजरा करावा. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटीनुसार उत्सव साजरा करावा, असे आवाहन सांगली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील टोणपे यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगवी येथे सांगवी पोलिस ठाण्याच्या अंतर्गत 121 मंडळांची पोलिस प्रशासनासमवेत आढावा बैठक होऊन सुरक्षात्मक नागरिक आरोग्य आणि दळणवळण आदीतील त्रुटी निकाली काढण्यावर चर्चा झाली. यामध्ये सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर या भागातील मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकार्‍यांची आणि कार्यकर्ते यांनी आपल्या समस्या मांडल्या.

पोलिस निरीक्षक सुनील टोणपे म्हणाले की, धार्मिक सण उत्साहात साजरे करावेत. यावेळी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. जातीय सलोखा राखावा. याची काळजी घ्यावी. उच्च आवाज क्षमतेच्या ध्वनिक्षेपकांचा वापर टाळावा. पारंपरिक वाद्याचा वापर करावा बेवारस वस्तू तसेच संशयास्पद व्यक्ती विषयी माहिती मिळाल्यास घाबरून न जाता पोलिसांना माहिती द्यावी. गुलालाचा वापर केवळ पूजेसाठी करून मिरवणुकीत गुलालाची उधळण करण्याऐवजी फुलांचा वापर करावा. दोन वर्षाचा काळ अत्यंत खडतर गेला. कोरोना असल्याने उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या.

पण सध्या वातावरण निवळल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव उत्साहात साजरा करता येणार आहेत. गणेशोत्सव म्हटलं की ढोल ताशांचा गजर आलाच गतवर्षी कोरोनामुळे सार्वजनिक मिरवणुकीवर बंदी होती. उत्सव उत्सवावर ही मर्यादा आल्या होत्या. सध्या दैनंदिन जीवन सुरळीत असून वादनालाही परवानगी आहे. त्यामुळे उत्सवप्रेमी यंदाच्या गणेशोत्सव अधिक जल्लोसात साजरा करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र शहरातून दिसून येत आहे.

Back to top button