पिंपरी : घरांसह वाहन संख्येत वर्षभरात मोठी वाढ

पिंपरी : घरांसह वाहन संख्येत वर्षभरात मोठी वाढ
Published on
Updated on

मिलिंद कांबळे :  पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात राहण्यासाठी मोठी पसंती दिली जात आहे. त्यामुळे शहरात लोकवस्ती निर्माण होऊन झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. त्याचबरोबरीने वाहनांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. वर्षभरात शहरात हजारो नवीन घरे उभी राहिली; तर डिझेल, पेट्रोलसह सीएनजी व इलेक्ट्रिक इंधनावरील लाखो वाहने रस्त्यावर धावत आहेत. देशातील तसेच, राज्यातील लोकांची पिंपरी-चिंचवडला मोठी पसंती मिळत असल्याने शहरातील चारी बाजूस टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. मोठ मोठे गृहप्रकल्प निर्माण होत आहेत. परिणामी, लोकवस्ती वाढत आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या सद्य:स्थिती अहवालातील आकडेवारीवरून ही बाब अधिक ठळक झाली आहे.

पालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाने एक एप्रिल 2011 ते 31 मार्च 2022 या एका वर्षांच्या कालावधीत शहरात तब्बल 934 गृहप्रकल्पांना परवानगी दिली आहे. त्या प्रकल्पांतून एकूण 52 लाख 66 हजार 566.64 चौरस मीटर इतके नवे बांधकाम झाले. म्हणजेच घरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच, व्यापारी संकुलही निर्माण झाली आहेत. वर्षभरात भोसरी, पिंपरी, आकुर्डी, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चर्‍होली, बोर्‍हाडेवाडी, चिखली, दिघी या परिसरात सर्वांधिक बांधकामे करण्यात आली. तसेच, बांधकाम परवानगी न घेता अनधिकृतपणे शेकडो घरे उभी राहिली आहेत. ते उघड सत्य आहे.

शहरातील त्यापूर्वी सन 2019-20 ला 532 गृहप्रकल्पांना आणि सन 2020-21 या वर्षांत 433 गृहप्रकल्पांना परवानगी दिली गेली. कोरोना महामारीमुळे संथ झालेले बांधकाम क्षेत्राने पुन्हा तेजी घेतल्याचे या आकडेवारीवरून
स्पष्ट होत आहे.

वर्षभरात 7 हजार नवीन वाहने
शहरात पीएमपीएल, मेट्रो, रेल्वे या सार्वजनिक वाहन व्यवस्थेचे जाळे मोठ्या प्रमाणात नसल्याने नागरिकांची वाहन खरेदीची पसंती कायम आहे. एका कुटुंबात अनेक कार व दुचाकी वाहने ही पद्धत सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील खासगी वाहनांची संख्या वेगात वाढत आहे. सन 2021-22 या वर्षात सर्वांधिक 61 हजार 642 दुचाकी, 32 हजार 280 कार खरेदी करण्यात आल्या. एका वर्षात तब्बल 1 लाख 7 हजार 46 नव्या वाहनांची भर शहरात पडली. तसेच, सीएनजी वाहनांनाही पसंती मिळत असून, वर्षभरात 12 हजार 723 कार आणि 2 हजार 801 दुचाकी खरेदी केल्या गेल्या. याचप्रमाणे पर्यवरणपूक व किफायतशीर अशा इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास नागरिक पंसती देत आहेत. इलेक्ट्रिक दुचाकी व कार रस्त्यावर धावताना दिसत आहेत. व्यायामासाठी म्हणून सायकलप्रेमींची संख्याही लक्षणीय वाढली आहे.

शहरातील घरे, वाहनांची वाढती संख्या
वर्ष लोकसंख्या घरांची नोंद वाहनखरेदी
2020-21 27 लाख 15 हजार 389 97 हजार 1
2021-22 27 लाख 28 हजार 976 1 लाख 7 हजार 46

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news