पिंपरी : गोडाऊनमधून 11 लाखांचे साहित्य चोरीला | पुढारी

पिंपरी : गोडाऊनमधून 11 लाखांचे साहित्य चोरीला

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शटर उचकटून चोरट्यांनी गोडावूनमधून अकरा लाख 16 हजार 180 रुपयांचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार गुरुवारी (दि. 18) सायंकाळी साडेसहा ते शुक्रवारी (दि. 19) सकाळी नऊ या कालावधीत एटीई वेल्डिंग इंजिनिअरिंग रोबोटिक्स अँड ऑटोमिशन प्रा. लि., पिंपरी येथे घडली. संजय प्रभाकर डेरे (45, रा. प्राधिकरण निगडी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या एटीई वेल्डींग इंजिनिअरिंग रोबोटिक्स अँड ऑटोमेशन प्रा. लि. या कंपनीचे पिंपरी येथे गोडाऊन आहे. दरम्यान, गोडावून कुलूप लावून बंद असताना चोरट्यांनी मागच्या बाजूचे शटर उचकटून आतील अकरा लाख 16 हजार 180 रुपये किंमतीचे स्पेअर पार्ट चोरून नेले आहेत. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button