जुनी सांगवीत विजेचा खोळंबा | पुढारी

जुनी सांगवीत विजेचा खोळंबा

 

दापोडी :  जुनी सांगवी संगमनगर येथील अविनाश अपार्टमेंट गल्लीतील मुख्य केबल जळाल्यामुळे शुक्रवारी दिवसभर विजेचा खोळंबा झाला होता. वीज नसल्यामुळे सकाळपासून नागरिकांची अतिशय तारांबळ उडाली. त्यामुळे संगमनगरचा अर्धाभाग अंधारात होता. याबाबत नागरिक राजू सावळे यांनी महावितरणकडे तक्रार केली होती. त्यानंतर महावितरणच्या कर्मचार्‍यांना दुपारी फॅाल्ट सापडला. खोदाई केल्यानंतर नवीन केबल जोडून वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

महावितरणकडे वायर व अन्य साहित्यांचा कोणताही स्टॅाक नाही. त्यामुळे दोन तासांनतरही झाले तरी केबल उपलब्ध होत नव्हती. यामुळे महावितरणचा भोंगळ कारभार दिसून आला. सकाळी दिवसभर वीज नसल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला.

Back to top button