ब्रेकिंग! पुणे जिल्ह्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, तिघांचा मृत्यू

Pune helicopter crash | धुक्यामुळे घडली दुर्घटना
Pune helicopter crash, Pune Fire Department
पुणे जिल्ह्यातील बावधन जवळ हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. (Image source- Pune Fire Department)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे जिल्ह्यातील बावधन (Bavdhan) जवळ हेलिकॉप्टर कोसळून (Pune helicopter crash) तिघांचा मृत्यू झाला आहे. धुक्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दोन रुग्णवाहिका आणि चार अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. ऑगस्टा १०९ असे बावधन जवळ दुर्घटनाग्रस्त झालेल्या हेलिकॉप्टरचे नाव आहे.

या अपघातात दोन पायलट आणि एका विमान देखभाल अभियंत्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (helicopter crash today) या हेलिकॉप्टरमध्ये प्रवासी नव्हते. हेलिकॉप्टरमध्ये २ पायलट आणि एक अभियंता होता. सर्व तीन क्रू मेंबर्सची यात जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये कॅप्टन पिल्लई आणि कॅप्टन परमजीत हे पायलट होते. ही प्राथमिक माहिती असून त्याची पुष्टी केली जात आहे,” असे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) अधिकाऱ्याने सांगितले.

सुनील तटकरे 'त्या' हेलिकॉप्टरने जाणार होते रायगडला

बावधन जवळील डोंगराळ भागात सकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टरने गोल्फ कोर्सवरील हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर पुण्यातील हेरिटेज एव्हिएशनचे होते. त्याचा नोंदणी क्रमांक VT EVV असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, हे हेलिकॉप्टर राष्ट्रवादी काँग्रेसने भाड्याने घेतले होते आणि ते मुंबईच्या दिशेने चालले होते. सुनील तटकरे ह्या हेलिकॉप्टरने रायगडला जाणार होते, असे वृत्त आहे. (helicopter crash in pune)

Pune helicopter crash, Pune Fire Department
इंदापुरात पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चालकावर गोळीबार

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news