सुलतानपूरला चिखलमय रस्ते | पुढारी

सुलतानपूरला चिखलमय रस्ते

मंचर; पुढारी वृत्तसेवा: मंचर नगरपंचायतीच्या हद्दीतील सुलतानपूर रस्त्यावरील जुना बैल बाजार ते चिंचोटी मळा रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे. जुना बैल बाजार ते चिंचोटी मळा धादरा देवी मंदिरापर्यंत सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता आहे. माजी सरपंच मीराताई बाणखेले यांच्या घरापासून पुढे डांबरीकरण राहिले आहे. त्यामुळे पावसाळ्यात शेतकर्‍यांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना अक्षरशः गाळातून मार्गक्रमण करावे लागते.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे येथे प्रवासी वाहनचालक येण्यासाठी धजावत नाही. रस्ता दुरुस्तीसाठी वारंवार मागणी करूनही कार्यवाही होत नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली. सद्यस्थितीत तेथे खडीकरण किंवा मुरमीकरण काहीच राहिलेले नाही. तातडीने मुरमीकरण केल्यास काही प्रमाणात वाहतुकीला मदत होईल. दिवाळीनंतर डांबरीकरण होणं गरजेचे आहे, असे शेतकरी अतुल दत्तात्रय बाणखेले यांनी सांगितले.

Back to top button