अतिक्रमणांवर धडक कारवाई; मुंढव्यातील 70 अनधिकृत होर्डिंग्जवरील कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप | पुढारी

अतिक्रमणांवर धडक कारवाई; मुंढव्यातील 70 अनधिकृत होर्डिंग्जवरील कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

मुंढवा; पुढारी वृत्तसेवा: मुंढवा चौक, केशवनगर-मांजरी रोड व केशवनर येथील रेणुकामाता रस्ता येथील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणांवर मनपाच्या हडपसर सहायक आयुक्त कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात आली. अतिक्रमणांवर कारवाई होते. मात्र, येथील 70 अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न या वेळी येथील नागरिकांनी उपस्थित केला.

मनपाकडून अतिक्रमणावरून 6 अनधिकृत हातगाडी, 5 लोखंडी काउंटर व 25 अनधिकृत भाजी विक्रेते तसेच रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या बोर्ड व बॅनरवर कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त प्रसाद काटकर, अतिक्रमण विभागाचे गणेश तारू, आकाशचिन्ह विभागाचे अनिल डांगमाळी, राजू बडदे या वेळी
उपस्थित होते.

पालिकेच्या अधिकार्‍यांकडून शुल्क वसूल करा
केशवनगरचा पालिकेत समावेश होऊन पाच वर्षे झाली आहेत. येथे सुमारे 70 पेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग्ज आहेत. अद्याप येथील एकाही होर्डिंगला पालिकेने शुल्क आकारणी केलेली नाही. त्यामुळे पाच वर्षांत पालिकेचे सुमारे पाच कोटी रुपये उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे ते शुल्क संबंधित अधिकार्‍यांकडून वसूल करा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

Back to top button