मध्यवर्तीसह पश्चिम पुण्यात येत्या गुरुवारी पाणी नाही! | पुढारी

मध्यवर्तीसह पश्चिम पुण्यात येत्या गुरुवारी पाणी नाही!

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वारजे जलकेंद्र, स्वारगेट पाणीपुरवठा केंद्र आणि होळकर जलकेंद्र येथे विविध स्वरूपाची देखभाल आणि दुुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यामुळे शहराचा मध्यवर्ती भाग आणि पश्चिम भागाचा पाणीपुरवठा गुरुवार 25 ऑगस्ट रोजी बंद राहणार आहे. दुसर्‍या दिवशी कमी दाबाने आणि उशिराने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर
वारजे जलकेंद्र – चांदणी चौक, पाषाण, भूगाव रोड, बावधन, डावी आणि उजवी भुसारी कॉलनी, पौड रोडवरील काही भाग, डुक्कर खिंड, सुतारवाडी, निम्हणमळा, सूस रोड, बाणेर, बालेवाडी, विजयनगर, काकडे सिटी, वारजे, माळवाडी, कर्वेनगर, महात्मा सोसायटी, कोथरूड वॉर्ड ऑफिस, लक्ष्मीनगर, शांतीवन गांधी स्मारक, हिंगणे होम कॉलनी, होम कॉलनी, सिप्ला फाउंडेशन, मिलेनियम स्कूल, कर्वेनगर गावठाण, तपोधाम परिसर, रामनगर, गोसावी वस्ती, कॅनॉल रोड या भागात पाणीपुरवठा बंद राहील.

एस.एन.डी.टी. जलकेंद्र – गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, रेव्हेन्यू कॉलनी, कोथरूड, हॅपी कॉलनी, मेघदूत, तेजसनगर, डहाणूकर कॉलनी, सुतारदरा, किष्किंदानगर, जय भवानीनगर, रामबाग कॉलनी, हनुमाननगर, केळेवाडी, गुजरात कॉलनी, गाढवे कॉलनी, ज्ञानेश्वर कॉलनी, आयडीयल कॉलनी, वडारवाडी, सेनापती बापट रोड, जनवाडी, वैदुवाडी, भोसले नगर, अशोकनगर, शिवाजी हौ. सोसायटी, भांडारकर रोड, प्रभात रोड, आपटे रोड, घोले रोड, सेनापती बापट रोड, पंचवटी, गणेशनगर, एरंडवणा, परिसर, कर्वेरोड, युनिर्व्हसिटी, खडकी परिसर, हनुमाननगर, जनवाडी, वैदूवाडी, वडारवाडी, पोलिस लाइन, संगमवाडी या भागाचा पाणीपुरवठा बंद राहील.

पर्वती जलकेंद्र – शहराच्या पेठांच्या परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपिंग येथून होणारा मुळा रोड, खडकी कॅन्टेन्मेंट संपूर्ण परिसर, एचइ फॅक्टरी, एमईएस या भागातील पाणीपुरवठा बंद राहील. चतु:श्रुंगी टाकी येथून औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, नॅशनल सिंघ सोसायटी, औंध गाव परिसरात होणारा पाणीपुरवठा बंद राहील.

Back to top button