पिंपरी : ऐक्यासाठी कर्मचार्‍यांनी घेतली प्रतिज्ञा | पुढारी

पिंपरी : ऐक्यासाठी कर्मचार्‍यांनी घेतली प्रतिज्ञा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : जनतेचे भावनिक ऐक्य व सामंजस्यासाठी काम करण्याची प्रतिज्ञा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी गुरुवारी (दि.18) घेतली. पालिका भवनात अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सद्भावना दिनानिमित्त शपथही घेण्यात आली. कार्यक्रमास मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

प्रफुल्ल पुराणिक यांनी प्रतिज्ञेचे वाचन केले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती 20 ऑगस्टला असून, हा दिवस सद्भावना दिन म्हणून पाळला जातो. त्या दिवशी सुटी असल्याने शासन निर्णयानुसार आज जयंती साजरी करण्यात आली. पालिकेतर्फे शनिवार (दि. 20) ते सोमवार (दि. 5) या कालावधीमध्ये सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचा अवलंब न करता, वैयक्तिक किंवा सामूहिक स्वरुपाचे सर्व मतभेद, विचारविनिमय करून तसेच, संविधानिक मार्गाचा अवलंब करून सोडविण्याची आणि जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता काम करण्याची शपथ कर्मचार्‍यांनी घेतली.

Back to top button