लिफ्टच्या बहाण्याने लुटणार्‍यास अटक | पुढारी

लिफ्टच्या बहाण्याने लुटणार्‍यास अटक

मंचर : कळंब (ता. आंबेगाव) येथील गणेश दगडू मोढवे (रा. साकोरे, ता. आंबेगाव) यांना लिफ्टचा बहाणा करत चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणच्या पथकाने आरोपी शंकर चंद्रकांत तुपे (24, रा. घोडेगाव, जि. अहमदनगर) याला शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पकडले. त्याला पुढील कारवाईसाठी मंचर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गणेश मोढवे हे कळंब गावच्या हद्दीत कॅनॉलच्या बाजूच्या रस्त्याने जात असताना तीन अनोळखी इसमांनी त्यांना बेदम मारहाण केली.

तसेच त्यांच्याकडील पाच हजार रोख व मोबाईल काढून घेतला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची नावे निष्पन्न केली. परंतु, आरोपी गुंगारा देत होते. आरोपी शिक्रापूर येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिस निरीक्षक अशोक शेळके, गणेश जगदाळे आदींच्या पथकाने शिक्रापूर-चाकण रोडला शंकर तुपे याला ताब्यात घेतले.

Back to top button