मंचर : एसटीची काच फोडली, गुन्हा दाखल

मंचर : एसटीची काच फोडली, गुन्हा दाखल

मंचर : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पर्यटकांना घेऊन येणार्‍या एस. टी. बसची काच फोडून नुकसान केल्याप्रकरणी जाबीर गुलाब इनामदार (रा. भीमाशंकर) याच्यावर घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची फिर्याद एस. टी.चे सहायक वाहतूक निरीक्षक कमर शेख यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात दिली.

वाहतूक निरीक्षक टी. एन. पवळे यांना दि. 13 रोजी एसटीची मिनी बस (एमएच 12 आरएन 4919) ची मागची काच फुटल्याचे दिसले. सदर काच जाबीर गुलाब इनामदार याने दगड मारून फोडल्याचे एसटी कर्मचार्‍यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news