पिंपरी : हजारो लिटर पाणी व्हॉल्व फुटल्याने वाया | पुढारी

पिंपरी : हजारो लिटर पाणी व्हॉल्व फुटल्याने वाया

पिंपरी : निगडी भक्ती-शक्ती उद्यानाजवळ पाण्याचा व्हॉल्व तुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. व्हॉॅल्वमधून गळती होऊन पाणी पूर्ण रस्त्यावर वाहून जात आहे. शहरात आज गेली पाच ते सहा वर्षे एक दिवसाआड पाणी पुरवठा करुन पाणी बचतीचा प्रयत्न केला जातो. पिंपरी चिंचवड शहरास पाणी पुरवठा करणार्या पवना धरणामध्ये पावसाळा सुरु होईपर्यंत मुबलक पाणी शिल्लक रहावे यासाठी वर्षभर महापालिकेने पाणीकपात जाहीर करुन एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे धोरण आंमलात आणले.

मात्र, एकीकडे दिवसाआड पाणी पुरवठा करुन पाणी बचतीचे धोरण राबवायचे अन दुसरीकडे पाणी गळतीकडे दुर्लक्ष करायचे असे चित्र दिसत आहे. पाण्याच्या पाईपमधून व व्हॉॅल्वमधून पाणीगळती, पाण्याचे कारंजे यामधून पाण्याचा होणारा अपव्यय ही नित्याचिच बाब झाली आहे. परंतु, शहरातील बहुतांश ठिकाणी पाणी गळतीकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.

Back to top button