सावधान… ‘स्वाइन फ्लू’ पाय पसरतोय! राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात; 13 जणांचा मृत्यू | पुढारी

सावधान... ‘स्वाइन फ्लू’ पाय पसरतोय! राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात; 13 जणांचा मृत्यू

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात स्वाइन फ्लूने (क1छ1) डोके वर काढत पुण्याबरोबर मुंबई, ठाणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसारख्या मोठ्या शहरांना विळख्यात घेतले आहे. अवघ्या आठ महिन्यांत 1449 रुग्ण आढळले असून, 43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील सर्वाधिक 13 पुण्यातील आहेत. राज्यात कोरोनाच्या उद्रेकानंतर आता स्वाइन फ्लू रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत या अवघ्या आठ महिन्यांत 1449 रुग्ण आढळले आहेत.

यापैकी एकट्या पुण्यात 13, पाठोपाठ नाशिक, ठाणे व नागपूरमध्ये प्रत्येकी 6, 5, 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 2009 पासून आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे 3735 रुग्णांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागाच्या अभ्यासानुसार, मागील 13 वर्षांत 35407 रुग्ण आढळले असून, त्यापैकी सर्वाधिक 382 पुण्यातील आहेत. पुण्या मागोमाग मुंबईत 291, तर ठाण्यात 245 रुग्ण आहेत.

राज्यातील रुग्ण संख्येबाबत माहिती
देताना डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ‘वाढते स्वाइन फ्लू रुग्ण पाहता रुग्णांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत.’ डॉ. दीपेंद्र त्रिपाठी म्हणाले, ‘यापूर्वी स्वाइन फ्लूचे रुग्ण येत होते. मात्र, कोविडनंतर वयस्क रुग्ण लवकर घेरले जात आहेत.’

स्वाइन फ्लूची संख्या
वर्ष रुग्ण मृत्यू
2009 5278 268
2010 6118 669
2011 42 6
2012 1564 135
2013 643 149
2014 115 43
2015 8583 905
2016 82 26
2017 6144 778
2018 2594 462
2019 2287 246
2020 121 3
2021 387 2
2022 1449 43

 

Back to top button