पुणे : अल्पवयीन मुलीवर बळजबरीने डांबून बलात्कार | पुढारी

पुणे : अल्पवयीन मुलीवर बळजबरीने डांबून बलात्कार

पुणे : नातेवाईकांना ठार मारण्याची धमकी देऊन सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला बळजबरीने डांबले व तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी नितीन भंडारी (वय 29) याला अटक केली आहे. याबाबत 16 वर्षीय पीडितेने अलंकार पोलिस ठाण्यात भंडारी विरोधात फिर्याद दिली आहे. हा प्रकार गेल्या एक वर्षापासून सुरू असून, एप्रिल महिन्यात त्याने मुलीला दोन दिवस डांबून ठेवत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घाबरलेल्या मुलीने आता पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

Back to top button