पुणे : तळेगाव ढमढेरेत युवकावर पूर्ववैमनस्यातून हल्ला

पुणे : तळेगाव ढमढेरेत युवकावर पूर्ववैमनस्यातून हल्ला

तळेगाव ढमढेरे, पुढारी वृत्तसेवा : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे पूर्ववैमनस्यातून तरुणांकडून युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. संबंधित तरुणाने हल्ला हुकविल्याने थोडक्यात प्राण वाचले आहेत. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अदनान शेख, ओमकार शेवकर, किरण जाधव, श्रीनाथ सोनटक्के (सर्व राहणार- तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असे हल्ला करणार्‍या आरोपींची नावे असून, गुन्हा दाखल करण्यात आला. यश संतोष घुमे हा व त्याचा चुलत भाऊ हर्षल घुमे व ऋतुराज घुमे हे सर्वजण त्यांच्या बहिणीच्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी निघाले होते. पाच ते सहा दुचाकीवरून आलेल्या युवकांनी अडवून विचारले की, ओमकार शेवकर याला कोणी मारले, या कारणावरून तिघांना मारहाण केली.

यश घुमे याच्यावर कोयत्याचा हल्ला करताना तो हुकवला म्हणून त्याला कोयत्याचा उलट्या बाजूने कोयता लागला आणि उजव्या हाताला दुखापत झाली. दरम्यान, या प्रकरणातील यश घुमे, हर्षल घुमे, ऋतुराज घुमे, अभिषेक घुमे यांना मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news