पुणे : तीनशे फूट तिरंगा घेऊन पदयात्रा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते डीआरएम कार्यालयादरम्यान 300 फूट तिरंगा घेऊन पदयात्रा काढण्यात आली. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत पदयात्रा पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक मार्ग डीआरएम ऑफिस या ठिकाणी पोहोचली.
पुणे रेल्वे प्रबंधक रेणू शर्मा यांनी या यात्रेचे डीआरएम कार्यालयात स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त मंडल रेल्वे प्रबंधक ब्रिजेशकुमार आणि प्रकाश उपाध्याय, वरिष्ठ मंडल यातायात प्रबंधक डॉ. स्वप्नील नीला, मंडल संरक्षण अधिकारी देवेंद्र कुमार, बंडगार्डन पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (गुन्हे) अश्विनी सातपुते, आस्माचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे उपस्थित होते.