पुणे : नोकरीच्या आमिषाने 46 हजारांचा गंडा | पुढारी

पुणे : नोकरीच्या आमिषाने 46 हजारांचा गंडा

पुणे : मोबाईल क्रमांकावर फोन करून नोकरीचे आमिष दाखवले. त्यानंतर लिंकवर पैसे भरण्यास सांगितले. मात्र, तब्बल 46 हजार रुपये भरल्यानंतरही कोणतीही नोकरी न देता फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकावर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अरुण वामनराव ढवळे (46, रा. शिवाजी पॅलेस, वाघोली) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 10 मे ते 20 मे 2022 दरम्यान घडला. ढवळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे.

Back to top button