पुणे : कोयत्याने वार करून लुटले; दोघांना बेड्या | पुढारी

पुणे : कोयत्याने वार करून लुटले; दोघांना बेड्या

पुणे : तरुणाला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार करीत जबरदस्तीने मोबाईल घेऊन पसार झालेल्या दोघांना कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडून चोरीची पाच दुचाकी वाहने, चार मोबाईल जप्त करण्यात आले असून, कोंढवा, हडपसर, लोणीकंद, चंदननगर पोलिस ठाण्यातील तब्बल दहा गुन्हे उघडकीस आले आहेत.

अजय रनछोड खरे (वय 23, रा. काळेपडळ) योगेश गांधी अस्वले (20, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. 2 ऑगस्ट रोजी कोंढव्यातील उंड्री भागात एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा मोबाईल चोरल्याची घटना घडली होती, तेव्हापासून कोंढवा पोलिस आरोपींच्या मागावर होते. संशयित आरोपींना पुण्यधाम आश्रम रोड परिसरात सापळा रचून पथकाने ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील, गुन्हे निरीक्षक संजय मोगले पथकाने ही कारवाई केली.

Back to top button