नागरिकांना गंडा घालणाऱ्या सतिश कुंभाणीवर पुण्यात गुन्हा दाखल | पुढारी

नागरिकांना गंडा घालणाऱ्या सतिश कुंभाणीवर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिटकनेक्ट कंपनीचे प्रमुख सतिश कुंभाणी यांच्यासह साथीदारावर पुण्यात फसवणूकीसह गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. ज्यादा परताव्याच्या अमिषाने फिर्यादीला तब्बल 42 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून कुंभाणी आणि त्याच्या साथीदारांनी केली फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

फसवणूक प्रकरणी कुंभाणी सह त्याचे साथीदार सतिश जवेरीया, रणजीत सक्सेना,  दिवेश दर्जी, विरेश चरंतीमठ, रंकेश दर्जी आणि मेहूल पाचीघर यांच्यावर पुण्यातील सायबर पोलिसात गुन्हा दाखल. फसवणूक प्रकरणी सतिश कुंभाणी याला अमेरिकन पोलिसांनी मागील काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. तो सध्या त्या जामिनावर आहे. पुण्यातील तक्रारदाराची आभासी चलनात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने तब्बल 220 बिटकोईनची फसवणूक केली आहे. आजच्या बाजार भावा नुसार ही बिटकोईनची रक्कम 42 कोटींवर जाते.

Back to top button