पुणे : भीमाशंकर दर्शनासाठी १८ किमी पर्यंत रांग | पुढारी

पुणे : भीमाशंकर दर्शनासाठी १८ किमी पर्यंत रांग

भीमाशंकर (पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे तिसऱ्या सोमवारी व स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीमुळे सुमारे साडेतीन लाख भाविकांनी भीमाशंकर महाराज की जय व भारत माता की जय अशा घोषणा देत मुसळधार पाऊस व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. वाहनांच्या रांगा १८ की.मी. पर्यंत पोहचल्यामुळे अक्षरश: भीमाशंकरला गर्दीचा महापुर लोटला होता.

श्रीक्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी संपुर्ण श्रावण महिन्यामध्ये पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त येत असतात परंतु गेले दोन वर्ष कोरोना महामारीमुळे श्रावण यात्रा बंद होती. मुसळधार पडणारा श्रावणाचा पाऊस व धुके यामध्येच जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय व भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांमुळे स्वातंत्र्यदिनी भीमाशंकर व परिसर दुमदुमुण गेला. दुसरा शनिवारी आणि रविवार सुमारे चार लाख भाविकांनी घेतले दर्शन व तीसर्‍या सोमवारी स्वातंत्र दिन अशा सलग सुट्ट्या आल्यामुळे भीमाशंकर येथे मोठी गर्दी पहायला मिळाली. दर्शनाची रांग दीड कि.मी. अंतरापर्यंत येवुन पोहचली होती. भीमाशंकर परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सौंदर्य फुलले आहे. यामुळे भीमाशंकरला येणारे भाविक पर्यटक हे सातमाळी घाट तसेच ठिक ठिकाणी थांबुन निसर्गाचा आनंद लुटत होते.

हेही वाचा

Back to top button