हजारो भाविकांकडून रामलिंग महाराजांचे दर्शन | पुढारी

हजारो भाविकांकडून रामलिंग महाराजांचे दर्शन

शिरूर, पुढारी वृत्तसेवा: रामलिंग महाराज की जय, हर हर महादेवच्या जयघोषात शिरूर शहर व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. पवित्र श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारनिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा केल्या होत्या. शिरूर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत प्रभू श्री रामलिंगाच्या दर्शनास श्रावण महिन्यात पंचक्रोशीतील भाविकांबरोबरच अहमदनगर, श्रीगोंदा, पारनेर, जुन्नर, आंबेगाव या ठिकाणाहून ही अनेक भाविक दर्शनासाठी आले होते. दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. शिरूर शहरापासून तीन कि. मी. अंतर असलेल्या प्रभू रामलिंगाच्या दर्शनासाठी शहरातील अनेक भाविकांनी पायी चालत जाऊन दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

दर्शनास आलेल्या भाविकांना रामलिंग देवस्थान टस्टच्या वतीने दर्शनासाठी मुबलक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. भाविकांच्या गर्दीमुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. खेळणी, पाळणे, दुकाने, प्रसादाच्या दुकानांनी परिसर फुलून गेला होता. शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या वतीने दर्शनास आलेल्या भाविकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. मंदिराच्या बाहेर एक किलो मीटर लांब रांग दर्शनासाठी सकाळपासुन होती .तर देवस्थानच्या वतीने सुरक्षेचा उपाय म्हणून होमगार्डमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच, या ठिकाणी भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. देवस्थानच्या वतीने विश्वस्त खजिनदार पोपटराव दसगुडे ,रावसाहेब घावटे पाटील,बलदेवसिंग परदेशी,वाल्मिकराव कुरुंदळे ,गोदाजी घावटे ,बबनराव कर्डिले ,नामदेव घावटे यांनी मंदिर परिसरात उपस्थित राहुन भाविकांची गैर सोय होणार नाही याची दक्षता घेतली

Back to top button