पुणे : विश्वकर्मा विद्यालयात सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण | पुढारी

पुणे : विश्वकर्मा विद्यालयात सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

पुणे; ऑनलाईन डेस्क:  बिबवेवाडी येथील ब. रा. अग्रवाल ट्रस्टच्या विश्वकर्मा विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने 13 ते 15 ऑगस्ट रोजी विद्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले. 14 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण 7 महाराष्ट्र लाईट इंन्फटरी रेजिमेंट मधील कार्यरत असलेले अधिकारी CHM अनिल शिर्के, L/Hav. विजय शिंदे यांच्या हस्ते झाले. या रजिमेंटमधील सैनिकांना शाळेतील विद्यार्थीनिंनी बनविलेल्या राख्या पाठविण्यात आल्या होत्या.

राख्या त्यांनी जम्मू काश्मीर, द. आफ्रिका येथील जवानांना पाठविल्या. तेथील अधिकारी व जवान यांचा आभाराचा संदेश घेऊन अधिकारी आज विद्यालयामध्ये आवर्जून आले होते. याचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते आजचे ध्वजारोहण करण्यात आले. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना आपले अश्रु अनावर झाले.जवानांचे मनोगत ऐकून सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक भारावून गेले.

शाळेतील शिक्षक भगिनींनी व मुलींनी त्यांना राख्या बांधून आपले बंधुप्रेम व राष्ट्रप्रेम व्यक्त केले. शाळेच्या अध्यक्षा डॉ.तृप्तीजी अग्रवाल यांच्या संकल्पनेतून सह सचिव श्री.आर .सी .बेटावदकर सर, सौ. मधू शीतोळे मॅडम, मुख्याध्यपिका सौ. श्रद्धा येरोलकर, सौ. सुलभा देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक श्री.अशोक वीर, श्री. प्रवीण शिंदे, क्रीडा शिक्षक श्री. दिपक देशमाने व इतर शिक्षकवृंद यांनी नियोजन केले.

Back to top button