पिंपरी : राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा 2019 चा निकाल जाहीर

पिंपरी : राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा 2019 चा निकाल जाहीर

Published on

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने सन 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा कोरोना महामारीमुळे रखडलेला निकाल शनिवारी (दि.13) जाहीर करण्यात आला. भोसरीतील समस्त गव्हाणे तालीम मंडळाला 51 हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. तर, सातत्याने पहिल्या पाच क्रमांकांमध्ये येणार्‍या सात मंडळांना 'जय गणेश भूषण पुरस्कार' जाहीर झाला. याबाबतची माहिती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांनी दिली. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम येत्या गुरुवारी (दि.18) पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात सायंकाळी सहा वाजता होणार आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे. निगडीत झालेल्या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासणे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस माणिक चव्हाण, विश्वस्त अमोल केदारी, समन्वयक अनिल वाघेरे राजाभाऊ गोलांडे आदी उपस्थित होते. ट्रस्टमार्फत 2019 मध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पिंपरी-चिंचवडमधील 129 मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यामधून 109 गणेश मंडळे बक्षीसासाठी पात्र ठरली आहेत. या मंडळांना 13 लाख 1 हजार रुपयांच्या रोख बक्षिसांचे वाटप केले जाणार आहे.

या स्पर्धेत चिंचवड स्टेशन येथील यशस्वी मित्र मंडळ द्वितीय, जाधववाडी-चिखलीतील सुभाष मित्र मंडळ तृतीय, आकुर्डी गावठाणातील नागेश्वर मित्र मंडळ चतृर्थ आणि चिंचवडगावातील अखिल मंडई मित्र मंडळाने पाचवा क्रमांक पटकाविला आहे. या मंडळांना रोख रक्कम आणि चषक देण्यात येणार आहे. सातत्याने पहिल्या पाच क्रमांकांमध्ये येणार्‍या सात मंडळांना 'जय गणेश भूषण पुरस्कार' आणि 10 हजार रुपयांचे बक्षीस देऊन स्पर्धेतून निवृत्त केले जाणार आहे. त्यामध्ये भोसरी लांडगे आळीतील पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळ, निगडी गावठाणातील जय बजरंग तरुण मंडळ, निगडी, प्राधिकरणातील जय हिंद मित्र मंडळ, चिंचवड येथील एसकेएफ मित्र मंडळ, गांधीपेठ तालीम मित्र मंडळ, काळभोरनगर येथील राष्ट्रतेज तरुण मंडळ आणि भोसरीतील लांडगे लिंबाची तालीम मित्र मंडळ या मंडळांचा समावेश आहे.

असे झाले बक्षीस जाहीर
ही स्पर्धा प्रभागनिहाय घेण्यात आली. प्रथम क्रमांकाला 25 हजार, द्वितीय 22 हजार 500, तृतीय 20 हजार, चतृर्थ 17 हजार 500, पाचव्या क्रमांला 15 हजाराचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच जिवंत देखावे सादर करणार्‍या 15 मंडळांना 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. उत्कृष्ट स्थिर देखाव्याचे 5 मंडळांना 15 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. स्थिर व हलते देखावे करणार्‍या 20 मंडळाला 10 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. उल्लेखनीय देखावे सादर करणार्‍या 20 मंडळांना 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. विद्युत रोषणाईचे देखावे करणार्‍या 5 मंडळांना 5 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर झाले.
कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, 'कोरोना महामारीमुळे दोनवर्षे स्पर्धा झाली नाही. यंदा स्पर्धा होणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. उत्कृष्ट देखावे सादर करावेत'.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news