पिंपरी : सेल्फी घेताना तरुण बुडाला | पुढारी

पिंपरी : सेल्फी घेताना तरुण बुडाला

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मोबाईल कॅमेर्‍यात सेल्फी घेत असताना थेरगाव येथील केजुबाई बंधार्‍यात एक तरुण बुडाला. ही घटना शनिवारी (दि. 13) दुपारी घडली. थेरगाव येथील केजुदेवी बंधार्‍यात बुडालेल्या तरुणाचे नाव शिरीष भुजबळ (रा. चिंचवड) असे आहे.
वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी केजुबाई बंधार्‍याच्या पाण्याजवळ एकजण सेल्फी घेत होता.

त्यावेळी अचानक तोल गेल्याने तरुण पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन विभागाच्या वल्लभनगर आणि थेरगाव उपविभागाची दोन पथकेदेखील दाखल झाली असून रात्री उशिरापर्यंत तरुणाचा शोध सुरू होता.

Back to top button