निमसाखरला बंधार्‍याच्या 78 ढाप्यांची चोरी

निमसाखरला बंधार्‍याच्या 78 ढाप्यांची चोरी
Published on
Updated on

वालचंदनगर : निमसाखर (ता. इंदापूर) नजीक असलेल्या निरा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्‍याचे 78 ढापे चोरून नेल्याची घटना घडली. या परिसरात निरा नदीवर निमसाखर व पळसमंडळ या दोन गावांना जोडणारा कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे. पावसाळ्यापूर्वी बंधार्‍याचे लोखंडी ढापे काढून ठेवले जातात. चालू वर्षीही बंधार्‍याचे वापरायोग्य 511 ढापे काढून निमसाखर हद्दीत ठेवण्यात आले होते.

याशिवाय याच ठिकाणी खराब झालेले 363 ढापे काढून ठेवण्यात आले होते. गुरुवारी (दि. 11) मध्यरात्री काही चोरट्यांनी यातील वापरायोग्य 78 ढाप्यांची चोरी केली. यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत पाटबंधारेचे शाखाधिकारी रतन झगडे यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news