

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (दि. 13) कोरोनाचे 77 बाधित रुग्ण आढळले, तर सध्या शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 30 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरामध्ये दिवसभरात 130 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या गृहविलगीकरणात 484 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
शनिवारी दिवसभरात 927 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, तर 750 जणांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले. शहरात आजअखेर एकूण 3 लाख 68 हजार 866 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, 3 लाख 64 हजार 456 रुग्ण बरे झाले आहे. 4 हजार 627 रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.