पुणे : लाच स्वीकारताना हवालदाराला अटक | पुढारी

पुणे : लाच स्वीकारताना हवालदाराला अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पाच हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सहायक पोलिस आयुक्त कार्यालयाच्या कोथरूड विभागातील पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. कोथरूड पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. विजय एकनाथ शिंदे (वय 48) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) शनिवारी (दि.13) ही कारवाई केली. याबाबत 26 वर्षीय तक्रारदाने तक्रार केली होती. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार शिंदे कोथरूड विभागातील सहायक आयुक्त कार्यालयात कार्यरत आहेत. तक्रारदार आणि त्याच्या मित्रावर काही दिवसांपूर्वी चॅप्टर केस दाखल करण्यात आली आहे. या केसमध्ये दोघांना हजर करून जामिनासाठी मदत करण्यासाठी शिंदेंनी तक्रारदारकडे पाच हजारांची लाच मागितली. त्याबाबत तक्रारदाराने थेट लाचलुचपत विभागाकडे शिंदे यांची तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा केल्यावर आज सहायक पोलिस आयुक्त कार्यालयात सापळा लावून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत.

Back to top button