पिंपरी : कुंडाअभावी निर्माल्य पुलावरच | पुढारी

पिंपरी : कुंडाअभावी निर्माल्य पुलावरच

पिंपरी : थेरगाव पवना नदी पुलावरील घाटाजवळ निर्माल्य कुंड नसल्याने नागरिक नदीकाठच्या पुलावरील पदपथावर निर्माल्य टाकत आहेत. त्यामुळे परिसरामध्ये अस्वच्छता पसरली आहे. नदी व नदी परिसराच्या स्वच्छतेसाठी नदी घाटावर नागरिकांच्या सोयीसाठी निर्माल्यकुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे.

मात्र, थेरगाव याठिकाणी निर्माल्यकुंड नसल्याने नागरिकांना निर्माल्य कुठे टाकावे हा प्रश्न पडत आहे. अशावेळी नागरिक नदीवरील पुलावरच निर्माल्य टाकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुलावर अस्वच्छ पसरत आहे. नागरिकांच्या सोयीसाठी नदीपुलावर लवकरात लवकर निर्माल्य कुंडाची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Back to top button