‘देहूरोडवासीयांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात येईल’ : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील | पुढारी

‘देहूरोडवासीयांची मागणी मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात येईल’ : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

पिंपरी : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून नगरपरिषदेची स्थापना करण्याच्या विषयावर लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.
अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष व भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत रंगशारदा सभागृहात ‘हर घर तिरंगा’ अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

आमदार चंद्रकांत पाटील, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार आशिष शेलार, नितेश राणे यांना हाजी अराफत शेख, उपाध्यक्ष सागर लांगे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार आदींनी निवेदन दिले. यामध्ये म्हटले आहे, की देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे प्रशासन येथील स्थानिक नागरिकांना पाणी, आरोग्य यासारख्या प्राथमिक सुविधादेखील पुरवू शकत नाही. त्यामुळे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून देहूरोड नगर परिषदेची स्थापना करावी, या वेळी आमदार पाटील यांनी याबाबत लवकरच पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

Back to top button