पिंपरी : ट्रिपच्या बहाण्याने दांपत्याची फसवणूक | पुढारी

पिंपरी : ट्रिपच्या बहाण्याने दांपत्याची फसवणूक

पिंपरी : लडाख ट्रिपच्या बहाण्याने दांपत्याची 80 हजार 800 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 21 जानेवारी 2022 ते 24 जुलै 2022 दरम्यान पिंपळे गुरव येथे घडला. या प्रकरणी विक्रांत सूर्यकांत भोंगळे (32, रा. पिंपळे गुरव) यांनी बुधवार (दि. 10) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, लेट्स प्लॅन आऊट कंपनी आणि जयेश जगदीश मीना (रा. उलवे, नवी मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या कंपनीने फिर्यादी व फिर्यादी यांची पत्नी यांच्याकडून लदाख ट्रीपच्या बहाण्याने 80 हजार 800 रुपये घेतले. त्यानंतर ट्रिप पुढे ढकलल्याचे खोटे कारण सांगून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील तांबे करीत आहेत.

Back to top button