येरवडा : वाहतूक कोंडीबाबत आमदारांकडून पाहणी | पुढारी

येरवडा : वाहतूक कोंडीबाबत आमदारांकडून पाहणी

येरवडा; पुढारी वृत्तसेवा: वडगाव शेरी मतदारसंघातील कल्याणीनगर व पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असणार्‍या रस्त्यांची पाहणी आमदार सुनील टिंगरे यांनी पुणे पोलिस व महापालिकेच्या अधिकार्‍यांसोबत केली. विमानतळावरून येणारी वाहतूक ही प्रामुख्याने 509 चौकामधून होत असते. यामुळे चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरिकांचा वेळ वाहतूक कोंडीमध्ये जातो.

याचा दैनंदिन नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता आमदार सुनील टिंगरे यांनी 509 चौकाची पाहणी करून वाहतूक पोलिस व पथ विभागाच्या अधिकार्‍यांना 509 चौकात अनेक ठिकाणी रुंदीकरण करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच 509 चौक ते स्काय बेलवेडेरे सोसायटी, विमाननगरकडे जाणार्‍या रस्त्याच्या ठिकाणी रुंदीकरण करणे व तात्पुरते दुभाजक बसविणे, 509 चौकाचे सर्व बाजूंनी रुंदीकरण करण्याचे निर्देश महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना दिले. 509 चौकाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर नक्कीच वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार टिंगरे यांनी व्यक्त केला.

Back to top button