पुणे : आव्हाळवाडीत अडीच लाखांची घरफोडी

पुणे : आव्हाळवाडीत अडीच लाखांची घरफोडी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: फळविक्रेत्याच्या अर्धवट उघड्या राहिलेल्या घराच्या दरवाजावाटे आत शिरून चोरट्यांनी 2 लाख 45 हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. हा प्रकार लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आव्हाळवाडी येथील सदगुरू कॉम्प्लेक्समध्ये घडला. याप्रकरणी चार अनोळखी आरोपींवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुस्तफा पठाण (53, रा. आव्हाळवाडी, माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news